Advertisement

विधान परिषद निवडणूक: उद्धव ठाकरे बिनविरोध बनले आमदार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांसोबत इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर (maharashtra vidhan parishad) बिनविरोध निवडून आल्याची घोषणा गुरुवारी दुपारी करण्यात आली.

विधान परिषद निवडणूक: उद्धव ठाकरे बिनविरोध बनले आमदार
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांसोबत इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर (maharashtra vidhan parishad) बिनविरोध निवडून आल्याची घोषणा गुरुवारी दुपारी करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १४ मे दुपारी ३ वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरची टांगती तलवार दूर झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने नियमानुसार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ६ महिन्यांत त्यांना विधीमंडळाचा सदस्य होणं बंधनकारक होतं. २७ मे २०२० रोजी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन ६ महिने पूर्ण होत आहेत. त्याआधीच म्हणजे २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. 

हेही वाचा - उद्धव ठाकरे निघाले नोकरदार, संपत्तीचा आकडा बघून चकीत व्हाल!

त्यानुसार शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे, भाजपकडून रणजीतसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रवीण दाटके आणि रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसकडून राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. यांच्यासोबत अर्ज भरलेल्या एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाला, तर इतर ४ डमी उमेदवारांनी मुदतीआधीच आपले अर्ज मागे घेतल्याने ९ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी रिंगणात केवळ ९ उमेदवारच शिल्लक राहील होते.

त्यानंतर विधान परिषदेसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दुपारी ३ नंतर संपल्यावर हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे विधान परिषदेतील अधिकृत सदस्य झाल्याने त्यांची खुर्ची आता आणखी भक्कम झाली आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मागणीला रामदास आठवलेंचा विरोध

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा