Advertisement

उद्धव ठाकरे निघाले नोकरदार, संपत्तीचा आकडा बघून चकीत व्हाल!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधान परिषद निवडणुकीचा (vidhan parishad election) अर्ज भरताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा तपशील सादर केला आहे.

उद्धव ठाकरे निघाले नोकरदार, संपत्तीचा आकडा बघून चकीत व्हाल!
SHARES

निवडणुकीच्या आखाड्यात ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीवरून नेहमीच आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगलेला पाहायला मिळतो. परंतु विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाच्या (Uddhav Thackeray property) संपत्तीचा तपशील जगासमोर आला आहे. याआधी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी निवडणूक अर्ज भरताना संपत्तीचा तपशील दिला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधान परिषद निवडणुकीचा (vidhan parishad election) अर्ज भरताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा तपशील सादर केला आहे. 

विशेष म्हणजे उद्योग व्यवसायाला काॅलममध्ये त्यांनी नोकरी असं लिहिलं आहे. तर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावापुढं उद्योग/व्यवसाय असं लिहिलं आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या तपशीलानुसार, त्यांनी आपल्याकडे १४३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं. त्याशिवाय त्यांच्याकडे दोन घरं आणि एक फार्महाऊस आहे. विविध कंपन्यांच्या शेअर्समधून येणारा डिव्हिडंट हे त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. तर त्यांच्याकडे स्वत:चं एकही वाहन नाही.

उत्पन्नाचा स्त्रोत पुढीलप्रमाणे:

  • उद्धव ठाकरे- पगार/वेतन, व्याज, बोनस, लाभांश (डिव्हिडंट), भांडवली नफा
  • रश्मी ठाकरे – व्याज, भाडे, व्यावसायिक भागीदारी नफा

  • उद्धव ठाकरेंची संपत्ती – ७६ कोटी ५९ लाख ५७ हजार ५७७
  • रश्मी ठाकरेंची संपत्ती – ‬६५ कोटी ०९ लाख ०२ हजार ७९१
  • हिंदू अविभक्त कुटुंब – १ कोटी ५८ लाख १४ हजार ३९५
  • एकूण – १४३ कोटी २६ लाख ७४ हजार ७६३‬
    संपत्तीचं विवरण 
  • उद्धव ठाकरे यांची संपत्ती (जंगम – एकूण २४ कोटी १४ लाख ९९ हजार ५९३)
  • रश्मी ठाकरे यांची संपत्ती (जंगम – ३६ कोटी १६ लाख ४३ हजार ४५५)
  • हिंदू अविभक्त कुटुंब (जंगम – १ कोटी ५८ लाख १४ हजार ३९५)
    रोख रक्कम –
  • उद्धव ठाकरे – ७६,९२२
  • रश्मी ठाकरे – ८९,६७९
  • हिंदू अविभक्त कुटुंब – ३९,१२४
    बँक ठेवी –
  • उद्धव ठाकरे – १ कोटी ६० लाख ९३ हजार ६७५
  • रश्मी ठाकरे – ३४ लाख ८६ हजार ५५९
  • हिंदू अविभक्त कुटुंब – ५६ लाख २१ हजार ४३९

  • शेअर्स –उद्धव ठाकरे – २१ कोटी ६८ लाख ५१ हजार १रश्मी ठाकरे – ३३ कोटी ७९ लाख ६२ हजार ४६०हिंदू अविभक्त कुटुंब – २९ लाख ५८ हजार १४९
    पोस्ट किंवा विम्यातील गुंतवणूकउद्धव ठाकरे – ३ लाख रुपयेरश्मी ठाकरे – ३ लाख रुपयेहिंदू अविभक्त कुटुंब –  कर्ज दिले – येणे बाकी
    उद्धव ठाकरे – रश्मी ठाकरे – ६ लाख ६६ हजार ११२हिंदू अविभक्त कुटुंब
    वाहन 
  • उद्धव ठाकरे – नाही
  • रश्मी ठाकरे – नाही
  • हिंदू अविभक्त कुटुंब – नाही

            सोने, दागिने –

  • उद्धव ठाकरे – २३ लाख २० हजार ७३६
  • रश्मी ठाकरे – १ कोटी ३५ लाख २० हजार ९२९
  • हिंदू अविभक्त कुटुंब – ५३ लाख ४८ हजार ३०५
    मिळकत/व्याज –
  • उद्धव ठाकरे – ५८ लाख ५७ हजार २५९
  • रश्मी ठाकरे – ५६ लाख १७ हजार ७१६
  • हिंदू अविभक्त कुटुंब – १८ लाख ४७ हजार ३७८

    स्थावर मालमत्ता (जमिनीची किंमत) 

  • उद्धव ठाकरे – ५२ कोटी ४४ लाख ५७ हजार ९८४
  • रश्मी ठाकरे – २८ कोटी ९२ लाख ५९ हजार ३३६

  • हिंदू अविभक्त कुटुंब –
    कर्ज –
  • उद्धव ठाकरे – ४ कोटी ०६ लाख ०३ हजार ६२४
  • रश्मी ठाकरे – ११ कोटी ४४ लाख ३३ हजार १०९
  • हिंदू अविभक्त कुटुंब –

    उद्योग/व्यवसाय –

  • उद्धव ठाकरे – नोकरी
  • रश्मी ठाकरे – व्यवसाय

    उत्पन्नाचं साधन –

  • उद्धव ठाकरे – पगार/वेतन, व्याज, बोनस, लाभांश (डिव्हिडंट), भांडवली नफा
  • रश्मी ठाकरे – व्याज, भाडे, व्यावसायिक भागीदारी नफा
  • हिंदू अविभक्त कुटुंब –

    शिक्षण 

  • उद्धव ठाकरे –
  • बालमोहन विद्यामंदीर, दादर, मुंबई
  • सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, (डिप्लोमा) – वर्ष १९८२
    आदित्य ठाकरे यांची संपत्ती (विधानसभेच्या वेळेस)
  • बँक ठेवी – १० कोटी ३६ लाख रुपये
  • बॉन्ड शेअर्स – २० लाख ३९ हजार रुपये
  • वाहन – बीएमडब्ल्यू कार २०१० – किंमत अंदाजे ६ लाख ५० हजार रुपये
  • दागिने – ६४ लाख ६५ हजार
  • इतर – १० लाख २२ हजार
  • एकूण – ११ कोटी ३८ लाख
  • दोन व्यावसायिक प्रॉपर्टी – अंदाजे साडेतीन कोटी रुपये
  • कर्जत खालापूरला एक शेतजमिनीचा प्लॉट – अंदाजे ४४ लाख रुपये



हेही वाचा - 

उद्धव ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, मुख्यमंत्रीपदावरची टांगती तलवार दूर

पोलिसांना विश्रांतीची गरज, केंद्राने मनुष्यबळ द्यावं- उद्धव ठाकरे



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा