Advertisement

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मागणीला रामदास आठवलेंचा विरोध

मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी लोकलसेवा (local train) सुरु करण्याची परवानगी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून केली होती.

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मागणीला रामदास आठवलेंचा विरोध
SHARES

मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी लोकलसेवा (local train) सुरु करण्याची परवानगी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून केली होती. मात्र, या मागणीला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas athawale) यांनी विरोध केला आहे. 

लाॅकडाऊन (lockdown) सुरू झाल्यापासून रेड झोनमध्ये येणाऱ्या मुंबईत (red zone mumbai) अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी एसटी आणि बेस्ट बसची (best bus and msrtc bus) सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मुंबई शहर, उपनगर, वसई-विरार, पालघर, नवी मुंबई, ठाणे-कल्याण इत्यादी परिसरातून मोठ्या संख्येने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या बस सेवेचा वापर करून मुंबईत ये-जा करत आहेत. तरीही काही वेळेस बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं कठिण जात आहे. शिवाय या बस ठराविक वेळेतच सुटत असल्याने मधल्या वेळेत प्रवाशांना स्टाॅपवर तिष्ठत उभं राहावं लागत आहे. 

हेही वाचा -  मुंबई लोकल सुरू करु द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

अशी सर्व परिस्थिती असताना तसंच देशात पॅसेंजर ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली जात असताना मुंबईमध्येही उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती.

यासंदर्भात बोलताना रामदास आठवले म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे लोकल सेवा सुरु करण्याची केलेली मागणी चुकीची आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. शिवाय मुंबई रेड झोनमध्ये येत असून शहरातील झोपडपट्ट्यांसहीत अनेक ठिकाणी कोरोना व्हायरस परलेला आहे. अशा स्थितीत जर लोकल सेवा सुरु केली तर गर्दी रोखता येणार नाही. गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होईल. त्यामुळे केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यास परवानगी देऊ नये, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - पावसाळ्यात लोकलचं वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी विविध कामांना गती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा