Advertisement

विरारमधील जाहीर सभेत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?


विरारमधील जाहीर सभेत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
SHARES

येत्या २७ मे रोजी लोकसभेच्या २ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. पालघर आणि बीड अशा दोन जागांसाठी मतदान होणार आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने या पोट निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. यासाठी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजपाने मैदानात उतरवले आहे.


उत्तर भारतीय मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न?

उत्तर भारतीय मतदार आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून व्होटबँक तयार करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना बोलवण्यात आल्याचं बोललं जात आहे. २३ मे रोजी विरारच्या मनवेलपाडा भागात योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याप्रमाणेच विरार, नालासोपारा भागामध्ये उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहेत. याच मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून हे प्रयत्न करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

८.०० - योगी आदित्यनाथ यांनी मराठीत केली भाषणाची सुरुवात

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

  • उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं घट्ट नातं..
  • शिवाजीचं नाव घेणारे अफजलखानाचं काम करतायत - शिवसेनेला टोला
  • २०१४मध्ये देशात मोठ्या कार्याची सुरुवात
  • पालघरचं लोकसभा क्षेत्र उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचंही लोकसभा क्षेत्र
  • मोदीजींनी स्पष्ट सांगितलं की आमचं सरकार कोणत्याही जाती किंवा धर्मासाठी नाही
  • भाजप सरकार हे १२५ कोटी भारतीयांचं सरकार
  • २०१७पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये दंगली व्हायच्या
  • उत्तर प्रदेशात महिलांसाठी सुरक्षेचं वातावरण
  • उत्तर प्रदेशात कुणी कुणाला फसवत नाही
  • शिवसेनेच्या सद्य परिस्थितीमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला दु:ख होत असेल
  • बाळासाहेब ठाकरेंनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही
  • छत्रपती शिवाजी महाराष्ट्रा संपूर्ण देशाचे राष्ट्रनायक
  • आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बनवलं आहे
  • शिवाजी महाराज एका पक्षाचे नाहीत, ते राष्ट्रनायक आहेत
  • चिंतामन वनगांचा प्रश्न हा भाजपाचा अंतर्गत मुद्दा होता. त्यांना बळजबरी शिवसेनेत घेतलं
  • काँग्रेस संपली, इतरही तसेच संपणार
  • जनतेला गुंड आणि गुन्हेगारांना घाबरण्याचं कारण नाही
  • पालघरमधली गुंडगिरी भाजपा संपवू शकते
  • योगी आदित्यनाथ याचं भाषण संपलं.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा