Advertisement

पालघरच्या आखाड्यात उद्धवचा सामना योगीशी

योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा ज्या दिवशी होणार आहे त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्याही २ जाहीर सभा होणार आहेत. त्यातील एक सभा नालासोपऱ्यात होणार आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे या सभेत नेमकं काय बोलतात नि दोघं एकमेकांना काय उत्तर देतात याकडेच आता सर्वांच लक्ष लागलं आहे.

पालघरच्या आखाड्यात उद्धवचा सामना योगीशी
SHARES

पालघर पोटनिवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना आणि भाजपाने एकमेकांविरोधात दंड थोपटले असून दोन्ही पक्षांनी प्रचारावर चांगलाच भर देण्याचं ठरवलं आहे. एकाबाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युवा नेते आदित्य ठाकरे पालघरमध्ये रोड शो करत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा गाजवत असताना त्यांनी स्टार प्रचारक म्हणून नारायण राणेंनाही जोडीला घेतलं आहे. एवढं कमी की काय भाजपाने प्रचारात कुठंही कमी पडायला नको म्हणून थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंंत्री योगी आदित्यनाथ यांनाच प्रचाराच्या आखाड्यात उतरवलं आहे.


कधी घेणार सभा?

पालघर पोटनिवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ यांची विरारमधील मनवेलपाडा इथं २३ मे रोजी जाहीर सभा घेणार आहेत. नालासोपारा, विरार आणि पालघर परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मतदार आहेत. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना प्रचारासाठी उतरवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.


उद्धव यांचीही सभा

योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा ज्या दिवशी होणार आहे त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्याही २ जाहीर सभा होणार आहेत. त्यातील एक सभा नालासोपऱ्यात होणार आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे या सभेत नेमकं काय बोलतात नि दोघं एकमेकांना काय उत्तर देतात याकडेच आता सर्वांच लक्ष लागलं आहे.


कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न

योगी आदित्यनाथ यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या दोन जाहिर सभा एकाच वेळी नालासोपारा-विरार भागात होणार असल्यानं या परिसरात कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्याचं समजतं आहे.



हेही वाचा-

पालघर पोटनिवडणुकीने गडबडलं परीक्षांचं वेळापत्रक

पालघर पोटनिवडणुकीत राणे स्टार प्रचारक!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा