Advertisement

पालघर पोटनिवडणुकीत राणे स्टार प्रचारक!

भाजपाचे खासदार चिंतामण वानगा यांच्या निधनानंतर पालघरची जागा रिक्त झाली. वानगा यांच्या कुटुंबियांनी भाजपाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर वानगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वानगा यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडं भाजपानं काँग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वानगा विरूद्ध गावित यांच्यात या पोटनिवडणुकीत कडवी लढत होणार आहे.

पालघर पोटनिवडणुकीत राणे स्टार प्रचारक!
SHARES

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी पोटनिवडणुकीतील प्रचारातील रंगत वाढत चालली आहे. पालघरमध्ये खरी लढत असणार आहे ती भाजपा आणि शिवसेनेमध्ये. भाजपानं ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली प्रचारावर जोर देत भाजपाने थेट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणेंना मैदानात उतरवण्याचं ठरवलं आहे. शिवसेना हे नारायण राणे यांचं नेहमीच पहिलं टार्गेट असल्यानं राणे यांच्यामुळे प्रचाराची रंगत वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.

कुणाचे उमेदवार कोण?

भाजपाचे खासदार चिंतामण वानगा यांच्या निधनानंतर पालघरची जागा रिक्त झाली. वानगा यांच्या कुटुंबियांनी भाजपाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर वानगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वानगा यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडं भाजपानं काँग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वानगा विरूद्ध गावित यांच्यात या पोटनिवडणुकीत कडवी लढत होणार आहे.

शिवसेनेपुढं डोकेदुखी

दुसरीकडं वानगा कुटुंबियांच्या नाराजीमुळं आणि त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळं भाजपाला पालघरमध्ये जोर लावावा लागणार आहे. अशावेळी शिवसेनेला अंगावर घेणारा प्रचारक म्हणून राणेंचं नाव समोर आलं आहे. राणे आणि शिवसेना यांचं वैर जगजाहीर आहे. त्यामुळे भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेल्या राणेंना प्रचारासाठी आवतान दिलं ते दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.

राणेंचा पत्ता चालणार का?

फडवणीस यांची विनंती आणि समोर शिवसेना असल्यानं राणेंनी हे आवतान स्वीकारल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपानं खेळलेली ही नवी खेळी कितपत पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या कामी येते, राणेंचा पत्ता चालतो का? हे आता येणारा काळच सांगेल.

हेही वाचा-

'मग लोकशाहीची हत्या कशी?' - संजय राऊत

'मग बॅलेट पेपरने निवडणुका घेऊन दाखवा' - उद्धव ठाकरे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा