Advertisement

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी


पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी
SHARES

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने दिवंगत खासदार चिंतामन वनगा यांचे पूत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्यानंतर आता भाजपनं काँग्रेसमधून उमेदवार आयात केला आहे. भाजपनं राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, काँग्रेसचे दामोदर शिंगडा आणि भाजपचे राजेंद्र गावित यांच्यात आता निवडणुकीची चुरस रंगणार आहे.



शिवसेनेनं असं करायला नको होतं -मुख्यमंत्री

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामन वनगा यांच्या कुटुंबियाकडे भाजपने दुर्लक्ष केले होते. अखेर श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेची वाट धरली होती. त्यामुळे शिवसेनेनेही श्रीनिवास यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपने शिवसेनेवत टीकेची तोफ डागली. शिवसेनेनं असं करायला नको होतं. आम्ही श्रीनिवास यालाच उमेदवारी देणार होतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


हेही वाचा -

वनगा कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा