Advertisement

पालघर पोटनिवडणुकीने गडबडलं परीक्षांचं वेळापत्रक

लवकरच या परीक्षांचं तपशीलवार वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदूर्ग या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे.

पालघर पोटनिवडणुकीने गडबडलं परीक्षांचं वेळापत्रक
SHARES

पालघर लोकसभा निवडणुकीचा फटका मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांना बसला आहे. यामध्ये टीवाय बीकॉम, बीकॉम इन अकाऊंट्स अॅंड फायनांन्स, एमकॉम, एमसीए, इंजिनिअरींग यांसह आणखी काही प्रमुख अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. मे महिन्यात सुरू होणाऱ्या या परीक्षा आता २ जूनपासून घेण्यात येणार आहेत.

सर्व जिल्ह्यातील परीक्षांना फटका

लवकरच या परीक्षांचं तपशीलवार वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदूर्ग या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे.

कुठल्या परीक्षांचा समावेश

बीकॉम (बॅचलर इन कॉमर्स) तिसऱ्या वर्षातील वार्षिक परीक्षा, एमकॉम ( मास्टर इन कॉमर्स) सेमिस्टर २, एमसीए ( मास्टर इन कम्प्युटर अॅप्लिकेशन) सेमिस्टर २, बीई (बॅचलर इन इंजिनिअरींग) सेमिस्टर ८, एसई (बॅचलर ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरींग) सेमिस्टर ३, बीकॉम सेमिस्टर ५, बीकॉम (अकाऊंट्स अॅंड फायनान्स) सेमिस्टर ५ या परीक्षांचे सर्व पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.

नवं वेळापत्रक जारी

मुंबई विद्यापीठाने नुकतंच याबाबतच परीपत्रक जाहीर केले आहेत. या परीपत्रकानुसार परीक्षांचे वेळ व परीक्षा केंद्रात बदल होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच या वेळापत्रकातील बदलाची दखल सर्व कॉलेजांच्या प्राचार्यांनी घ्यावी असंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

या ७ परीक्षाव्यतिरिक्त २८ मे रोजी होणाऱ्या इतर परीक्षा ठरलेल्या वेळात होतील, अशी माहिती विनोद माळाळे, उपकुलसचिव, जनसंपर्क परीक्षा विभाग, मुंबई विद्यापीठ यांनी दिली.

हेही वाचा-

विद्यापीठाचा वेळापत्रक गोंधळ अद्याप सुरूच

'लॉ' शाखेचे आणखी तीन निकाल जाहीर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा