'नाराज असलो तरीही पक्षासाठी काम करेन'

 Mulund
'नाराज असलो तरीही पक्षासाठी काम करेन'
Mulund, Mumbai  -  

मुलुंड - भाजापाचे आमदार तारासिंग यांचा मुलगा रजनित सिंग याला उमेदवारी न दिल्याने तारासिंग नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवत खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. दरम्यान आपण नाराज असलो तरी शेवटपर्यंत भाजपाचे काम करणार असल्याचे तारासिंग यांनी सांगितले आहे. खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा निल सोमय्या याला वॉर्ड क्रमांक 108 तर शिवसेनेतून भाजपात प्रवेश करणाऱ्या प्रभाकर शिंदे यांना वॉर्ड क्रमांक 106 मधून उमेदवारी देण्यात आली. मात्र तारासिंग यांच्या मुलाला डावलण्यात आले त्यामुळे तारासिंग नाराज आहेत.

Loading Comments