Advertisement

पीएम केअर्स व्हेंटिलेटर्स खरेदीत घोटाळा?, सचिन सावंत यांची चौकशीची मागणी

पीएम केअर्स मार्फत महाराष्ट्राला पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटरची राज्यस्तरीय चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

पीएम केअर्स व्हेंटिलेटर्स खरेदीत घोटाळा?, सचिन सावंत यांची चौकशीची मागणी
SHARES

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर्स पूर्णतः निरुपयोगी असल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांनी नेमलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीला आढळलं आहे. हा एक घोटाळा असून महाराष्ट्राला पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटरची राज्यस्तरीय चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात ट्विट करत सचिन आरोप यांनी हे आरोप केले आहेत. त्यात ते म्हणतात की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी नेमलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीला पीएम केअर्स फंड अंतर्गत सदर संस्थेला पुरवलेले सर्व व्हेंटिलेटर पूर्णतः निरुपयोगी आढळले. त्यांच्या अहवालानुसार कंपनी तंत्रज्ञदेखील हे दुरुस्त करू शकले नाहीत. हा मोठा घोटाळा आहे.

केंद्रामार्फत पुरविल्या महाराष्ट्राला (maharashtra) पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटरची राज्यस्तरीय चौकशी करण्याची आम्ही मागणी करतो. पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून वाया गेलेला वेळ व जनतेचा पैसा अक्षम्य आहे. मोदी सरकारने देशातील सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना या अपारदर्शक फंडात देणगी देण्यासाठी भाग पाडलं. या फंड बाबत माहिती ही दिली नाही किंवा माहितीचा अधिकार लागू केला नाही. 

हेही वाचा- टीका झाली नसती तर ६ कोटी वापरले असते ना.., निलेश राणेंचा अजित पवारांना टोला

पण आता अशा अत्यंत तकलादू व फालतू कंपन्यांना हे कंत्राट कसं आणि का मिळालं हे जनतेला समजलंच पाहिजे. मानवतेकरिता या सर्वात मोठ्या संकटात घोटाळा सोडा, पण नफेखोरीचा होऊ देण्याचा विचार करणंही अमानुष आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला पीएम केअर्स फंडातून पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्समधून आॅक्सिजनचा पुरवठा योग्य दाबाने होत नसल्याच्या तक्रारी पुढं आल्या होत्या. नाशिकला पुरवण्यात आलेले ६० व्हेंटिलेटर्स सुटे भाग मिळत नसल्याने

अर्धवट स्थितीत होते. ३५ व्हेंटिलेटर्सपैकी काही व्हेंटिलेटर्स अजूनही नादुरूस्त असल्याचं म्हटलं जात आहे. मोदी सरकारने देशातील जनतेला रामभरोसे सोडल्याचं चित्र दिसत आहे, असंही सचिन सावंत म्हणाले.

(ventilator scam through PM cares fund alleges maharashtra congress spokesperson sachin sawant)

 
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा