Advertisement

टीका झाली नसती तर ६ कोटी वापरले असते ना.., निलेश राणेंचा अजित पवारांना टोला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळण्यासाठी एका खासगी कंपनीला सरकारकडून ६ कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र चहूबाजूंनी टीका झाल्यावर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला.

टीका झाली नसती तर ६ कोटी वापरले असते ना.., निलेश राणेंचा अजित पवारांना टोला
SHARES

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळण्यासाठी एका खासगी कंपनीला सरकारकडून ६ कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र चहूबाजूंनी टीका झाल्यावर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला. परंतु टीका झाली नसती, तर ६ कोटी रुपये वापरले असते ना.. पवार कुटुंब जनतेच्या पैशावर जगत असल्याचा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी लगावला.

कोणावर मेहरबानी केली अजित पवारांनी? टीका झाली नसती तर ६ कोटी वापरले असते ना... काय तर म्हणे एक पाऊल मागे. पवार कुटुंब फक्त जनतेच्या पैशावरच आयुष्य जगतंय. मुंबई मधलं यशवंतराव चव्हाण सेंटर स्वतःचं असल्यासारखं पवार कुटुंब वापरतात. पवार कुटुंबाने जनतेच्या पैशावरच वाटेल तशी मजा केली.

डॉक्टर, नर्सेस, पोलिसांचे पूर्ण पगार द्यायला राज्य सरकारकडे पैसे नाहीत. पण स्वतःच्या चमकोगिरीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी ५,९८,०२,४०० कोटी रुपये काढले. अजित पवार साहेब तुम्ही स्वतःवर कितीही खर्च केला व तुम्हाला मराठी मीडिया कितीही डोक्यावर घेऊ दे पण महाराष्ट्राची जनता तुम्हाला आपटणार, अशा शब्दांत निलेश राणे यांनी अजित पवार (ajit pawar) यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा- आमचं काम बोलतं, प्रसिद्धीची गरज नाही, पीआर नेमण्याचा निर्णय अजित पवारांकडून मागे

उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला होता. मात्र भाजपकडून झालेल्या टीकेनंतर हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

आमचं काम बोलतं, त्यासाठी प्रसिद्धीची गरज नाही. उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणं शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाज माध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

(bjp leader nilesh rane criticises ajit pawar on PR agency appoiting issue)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा