Advertisement

खडसे ३ महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या संपर्कात, असं का म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे गेल्या ३ महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा खडसे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.

खडसे ३ महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या संपर्कात, असं का म्हणाले शरद पवार?
SHARES

आगामी विधानसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे गेल्या ३ महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा खडसे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.

कार्यकर्त्यांचा दबाव

भाजपने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या यादीत खडसे यांचं नाव नसल्याने त्यांनी थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.  दुसऱ्या यादीत तरी आपलं नाव असेल, अशी त्यांना आशा होती. परंतु दुसऱ्या यादीतही नाव न आल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांकडून दबाव येऊ लागला. परंतु कार्यकर्त्यांसोबत घेतलेल्या बैठकीत पक्षाला नुकसान होईल, असं कुठलंही कृत्य करू नका, असे निर्देश त्यांनी दिले.  

३ महिन्यांपासून संपर्कात

दरम्यानच्या काळात नाराज खडसेंच्या भेटीला अजित पवार जळगावला जाणार असल्याच्या अफवा पसरल्या. त्यातच ठाण्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित असलेले पवार यांनी खडसेंबाबत वक्तव्य केलं. 'सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीला योग्य संधी मिळाली नाही की तो पर्यायाच्या शोधात असतो. खडसे गेल्या ३ महिन्यांपासून संपर्कात आहेत,' असं पवार म्हणाले.   

कुठल्याही पवारांना भेटलेलो नाही 

यावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले की, ' मागील ३ महिन्यांत काय, ३ वर्षांत कोणत्याही पवारांशी माझी भेट झालेली नाही. भाजप सोडण्याचा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही आणि घेण्याची शक्यताही नाही,' असा खुलासा खडसे यांनी केला.



हेही वाचा-

नितेश राणे लढणार भाजपच्या तिकीटावर

यादीत नाव नाही, तरीही खडसेंनी कसा भरला अर्ज?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा