Advertisement

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा 'या' कामांना अडथळा नाही

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं म्हाडातील लोकांची कामं प्रलंबित राहू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा 'या' कामांना अडथळा नाही
SHARES

राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागु झाली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं अनेक कामं प्रलंबित राहतात. मात्र, या आचारसंहितेमुळं म्हाडातील लोकांची कामं प्रलंबित राहू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आचारसंहितेत कोणतीही बंधनं वा बंधनं नसलेली कामं नेमकी कोणती हे सुस्पष्ट होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, आचारसंहितेच्या काळात नियमित प्रशासकीय कामांसाठी आचारसंहितेचं कोणतंही निर्बंध नसतं. त्यामुळं मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष - मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांना पत्र पाठवून या कामांविषयी सुस्पष्टता नमूद करण्यास सांगितलं आहे.

कामं प्रलंबित

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं म्हाडा कार्यालयात येणाऱ्यांची कामं प्रलंबित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच, आचारसंहितेदरम्यान कोणतेही नवीन निर्णय, घोषणा वा प्रकल्पाचा शुभारंभ आदी गोष्टी करण्यावर निर्बंध आहे. परंतु नियमित प्रशासकीय कामं करण्यावर कोणतीही बंधनं नाहीत. त्यामुळं आचारसंहितेच्या काळात नेमक्या कोणत्या कामांना बंधन असणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी म्हैसकर यांनी सर्व अधिकारी, इंजीनियर यांना त्याप्रमाणं सूचना देण्याचं पत्र चव्हाण यांनी पाठविलं आहे.

कामांचा आढावा

या पत्रात चव्हाण यांनी आचारसंहितेच्या काळात राज्य सरकार वा प्राधिकरणानं धोरणात्मक निर्णय घेत अर्थसंकल्पीय तरतुदीसह कामांना प्रारंभ केलेल्या कामांचा आढावा घेता येतो. तसंच, म्हाडातील विविध मंडळात लोकांशी संबंधित असलेले दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी आचारसंहितेचा कोणताही संबंध येत नसल्याचं नमूद केलं आहे.



हेही वाचा -

मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी

विधानसभा निवडणुकीसाठी माधुरी दीक्षितचं मतदारांना आवाहन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा