'सीएम अंकल आमचं गाव वाचवा'

विलेपार्ले -  सीएम अंकल आम्हाला वाचवा. सीएम अंकल प्लीज आमचं गाव वाचवा. शाळकरी मुलांनी थेट मुख्यमंत्र्यांना घातलेली ही साद. विमानतळ सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत सहार गावमधील तीन गावठाणांवर डोळा ठेवत या गावठाणांच्या सर्व्हेक्षणाचा घाट जीव्हीकेनं घातलाय. त्यालाच विरोध करण्यासाठी घरातल्या थोरामोठ्यांसोबतच ही मुलंही कामाला लागलीयेत.

सर्वेक्षणासाठी गावकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या नोटिसा म्हणजे आम्हाला बेघर करत गावठाण उठवण्याचा डाव असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.

विशेष म्हणजे सर्व्हेक्षणाच्या नोटिशीवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर 'मुंबई लाइव्हनं' संपर्क साधला असता पत्रकार असल्याचं कळताच थेट नंबर चुकीचा असल्याचं सांगण्यात आलं.

कंपनीनं गावठाण उठवण्याचा घाट घातला असताना मोठ्यांची नाही तर किमान या शाळकरी मुलांची तरी हाक प्रशासनानं ऐकावी अशीच अपेक्षा गावकऱ्यांची आहे.

Loading Comments