Advertisement

अपघातानंतर विनायक मेटेंना 1 तास मदतच मिळाली नाही

उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं निधन झालं.

अपघातानंतर विनायक मेटेंना 1 तास मदतच मिळाली नाही
SHARES

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मात्र, उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं निधन झालं. मात्र, या अपघातानंतर जवळपास 1 तास विनायक मेटे यांना मदत मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हेदेखील त्यांच्यासोबत होते. त्यांनी या अपघाताबद्दल बोलताना सांगितलं, की एका ट्रकने कट मारल्याने बीडकडून मुंबईकडे येताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला.

अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. यानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोनही उचलला गेला नाही. मदतीसाठी अनेकदा कदम विनवणी करत होते. मात्र, कोणीही गाडी थांबवली नाही.

मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो. मग एका व्यक्तीने गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली.

एका तासानंतर तिथं रुग्णवाहिका आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो, तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा