उद्धव-मेटे भेटीमागे दडलंय काय?

Matoshree
उद्धव-मेटे भेटीमागे दडलंय काय?
उद्धव-मेटे भेटीमागे दडलंय काय?
See all
मुंबई  -  

कलानगर - शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मातोश्रीमध्ये जाऊन भेट घेतली. शिवस्मारकाच्या जलपूजन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम भाजपाने पूर्णपणे हायजॅक केला होता. त्यामुळे शिवसेना तर नाराज होती मात्र या संपूर्ण कार्यक्रमामुळे विनायक मेटेही नाराज होते आणि त्यांनी याबाबत नाराजी व्यक्तही केली होती. विनायक मेटे आणि उध्दव ठाकरे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्यात. दरम्यान शिवसेना-भाजपाने एकत्र निवडणुका लढवाव्या आणि आम्हालाही सोबत घ्यावं अशी आमची सर्व घटक पक्षांची भावना व्यक्त केली. मात्र आम्हाला सोबत घेतलं नाही तर जिथं कुठं शक्य असेल तिथं आम्हाला निवडणुका लढवाव्याच लागतील. आम्ही भाजपाला प्रस्ताव दिलेला आहे अशी माहिती मेटे यांनी पत्रकारांना दिली. 26 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आमची ताकद जिथं असेल तिथं जागा द्या अन्यथा आम्हालाही वेगळा पर्याय निवडावा लागेल. महाराष्ट्रातल्या विषयात आम्हाला विश्वासात घेऊन सन्मानाची वागणूक भाजपाने दिली पाहिजे. उद्धव ठाकरेंनाही मान-सन्मान दिला जातो की नाही हे महाराष्ट्राला माहित असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.