विश्व हिंदू सेवा संघाची नुक्कड सभा

 Malad West
विश्व हिंदू सेवा संघाची नुक्कड सभा
Malad West, Mumbai  -  

मालाड - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 ते 1000 हजारांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. या नोटा नेमक्या कशासाठी रद्द करण्यात आल्या याची सामान्य जनतेला माहिती व्हावी, यासाठी रविवारी विश्व हिंदू सेवा संघाच्यावतीने मालाड लिंक रोड येथे नुक्कड सभा घेतली गेली. या माध्यमातून विश्व हिंदू सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांसह नागरिकांना परिपत्रक वाटून जनजागृती केली.

हे जनजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार असून. सामान्य नागरिक मोदींच्या या निर्णयाला विरोध करत नाहीत, मात्र सर्व राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते याला विरोध करतात. कारण त्यांच्याकडे काळापैसा आहे असा आरोप विश्व हिंदू संघाचे अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांनी केला. मुंबई प्रदेश अध्यक्ष कमलाक्ष शेट्टी, प्रदेश महामंत्री संदीप यादव आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Loading Comments