Advertisement

शिवसेनेच्या निदर्शनानंतर व्हीजेटीआय संचालकांचा माफीनामा


शिवसेनेच्या निदर्शनानंतर व्हीजेटीआय संचालकांचा माफीनामा
SHARES

दीक्षांत समारंभात व्हीजेटीआयच्या संचालकांकडून झालेला वीरमाता जिजाबाई भोसले यांचा अवमान खपवून घेणार नाही, त्यांनी माफी मागावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, शिवसेनेने दिलेल्या या इशाऱ्यानंतर अखेर व्हीजेटीआयच्या संचालकांनी माफी मागितली आहे.


व्हीजेटीआयच्या बाहेर निदर्शनं

माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट महाविद्यालय (व्हीजेटीआय) मध्ये झालेल्या दीक्षांत समारंभात वीरमाता जिजाबाई भोसले यांचा अवमान झाल्याचा आरोप शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केला. त्यामुळे संचालकांनी माफी मागावी, अशी मागणी करत शिवसेनेने व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर निदर्शनं केली.


अखेर माफी मागितली

संचालकांना वीरमातेचं नाव लिहिण्यास लाज वाटत असल्यास त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेनं केली. तर राष्ट्रमातेचा अपमान कदापी सहन करणार नाही. जर माफी मागितली नाही, तर संचालकांना उग्र आंदोलनाचा सामना करावा लागेल, असा इशारा महिला उपविभाग संघटक माधुरी मांजरेकर यांनी दिला होता.

दरम्यान, संचालक बैठकीत व्यस्त असल्याचा निरोप आल्याने शिवसैनिकांनी संचालक कार्यालयाबाहेर तीव्र घोष घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर, संचालकांनी जबाबदारी स्वीकारत याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आणि माफीनामा लिहून दिला असल्याची माहिती मनीषा कायंदे यांनी दिली.

राष्ट्रामातेचा असा अपमान निंदनीय आहे. त्यातही दीक्षांत समारंभास खुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित असताना अशी चूक होणे अधिक संतापजनक आहे.
- मनीषा कायंदे , प्रवक्त्या, शिवसेना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा