मतदान करा, सवलत मिळवा!

    मुंबई  -  

    मुंबई - मतदार राजाला मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग वेगवेगळ्या तऱ्हा वापरत असतात. पण, चेंबुरच्या डिलिशियस हॉटेलने चक्क हॉटेलच्या बिलात 15 टक्के सूट जाहीर केली आहे. 21 तारखेला मतदान करून या हॉटेलमध्ये जाणाऱ्या सर्व ग्राहकांना बिलामध्ये ही सूट मिळणार आहे. पण, त्यासाठी तुम्हाला बोटावरची मतदानाची शाई दाखवावी लागणार आहे. 15 टक्क्यांची ही ऑफर चेंबुरसोबतच दादरमध्येही सुरू आहे. पण, दादरमध्ये जेवण नसून हेअर कट तुम्हाला 15 टक्के सवलतीच्या दरात करून मिळणार आहे. नॅशनल हेअर क्राफ्टने ही स्पेशल स्कीम आणली आहे. मतदान करणं हे आपलं कर्तव्यच आहे. ते बजावण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑफरची गरज नाही. पण, त्यातही टाळाटाळ करणाऱ्यांना घराबाहेर पडण्यासाठी भाग पाडायला या ऑफर्स मदत करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.