'परिवर्तनासाठी मतदान करा'

  Mumbai
  'परिवर्तनासाठी मतदान करा'
  मुंबई  -  

  गिरगाव - कुलाबा, मलबार हिल या परिसरात 24 तास पाणी आहे, पण ज्या मराठी माणसाच्या मतावर शिवसेना निवडून येते त्यालाच पाणी नाही असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलाय. गिरगाव परिसरात आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

  विकासाच्या आड येऊ नका,शिवसेना तोंडाला वाटेल ते बोलते, त्यांच्याकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नाही. असंही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सुनावलं. शिवसेना मेट्रोला विरोध करत आहे. त्यांना मराठी माणसांचं हित नको आहे. आम्ही 120 फुटांच्या ऐवजी 500 फुटांचे घर त्यांना देणार आहे, त्यांचे कोणतेही नुकसान करणार नाही, असं देखील मुख्यमंत्री म्हणालेत.

  मुंबईत कंत्राटदार जगवण्यासाठीच शिवसेनेने आजपर्यंत काम केलं. महापालिका तुमची खासगी मालमत्ता नाही. ती मुंबईकरांची आहे आणि मुंबईला मालक नको सेवक हवे आहेत. त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागत आहोत. महापालिकेत एक हाती सत्ता तुम्ही द्याल आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत एक पक्षीय सत्ता येईल, असा मला विश्वास आहे. विनंती करतो भावनात्मक भाषणावर तुम्ही संधी दिलीत, आता परिवर्तनासाठी संधी द्या. 5 वर्षांनी उगवतात आणि भावनात्मक भाषण करतात त्याला बळी पडू नका. परिवर्तनासाठी मतदान करा तुमच्या जीवनात ही परिवर्तन होईल असंही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.