Advertisement

चेहरे बघू नका, धनुष्याकडे बघून मतदान करा - उद्धव ठाकरे


चेहरे बघू नका, धनुष्याकडे बघून मतदान करा - उद्धव ठाकरे
SHARES

शीव - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत प्रचार सभांना सुरुवात केली आहे. मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी शीव येथे प्रचार सभा घेतली. आमचा उमेदवार शिवरायांचा भगवा घेऊन पुढे जाणार, जिथे जिथे धनुष्यबाण आहे त्यांना निवडून द्या. चेहरे बघू नका, त्यांच्याकडून काम करुन घेण्याची शपथ मी घेतली आहे असं या वेळी उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

या वेळी शिवसेना खासदार राहूल शेवाळे, प्रतिक्षा नगरच्या नगरसेविका प्रणिता वाघधरे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, खासदार विनायक राऊत आणि सायन कोळीवाडा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हार्दिक पटेल मातोश्रीवर 
मंगळवारी मातोश्री येथे हार्दिक पटेल येऊन गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. हार्दिक पटेल हा एक साधा माणूस आहे. तुमच्या हातून तर अख्खा गुजरात निसटलायं, असा टोलाही त्यांनी या वेळी पंतप्रधानांना लगावला.
नोटाबंदीवरुन पुन्हा बरसले ठाकरे 
नोटाबंदीनंतर 50 दिवसात अच्छे दिन आले नाहीत तर माझी पाठ चाबकाने फोडा, असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. आता कुठे आहे चाबूक आणि कुठे आहे पाठ ? नोटाबंदीचा फायदा किती लोकांना झालायं. यावर इथंच मतदान घेतलं तर 100 टक्के हात उंचावतील यात शंका नाही.
वचननाम्याची वचनपुर्ती होणार 
भाजपाच्या जाहिरनाम्यावर स्टॅम्प पेपर का ? लोकांना सुद्धा भाजपाचा खोटेपणा कळून चुकलायं. शिवसेनेच्या जाहिरनाम्यावर फक्त शिवसेनाप्रमुखांचा चेहराच पुरेसा आहे, लोकांना विश्वास द्यायला. सत्तेत आल्यानंतर वैद्यकीय चिकित्सा मोफत, शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, मुंबईकरांसाठी मोफत महापालिका आरोग्य सेवा उपलब्ध करु असं वचनही या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं.
भाजपावर टिका 
मुख्यमंत्री कल्याण डोंबिवलीला गेल्यावर लोकांनी त्यांना काळे झेंडे का दाखवले? युती भाजपाने नाही शिवसेनेने तोडली . ही निवडणूक आम्हीच जिंकणार. आम्हाला काचकूच करायची सवय नाही एक घाव आणि दोन तुकडे. भाजपाने काय केलं गेल्या अडीच वर्षांत?

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा