आपले वोट, आपली ताकद

 Ghatkopar
आपले वोट, आपली ताकद
आपले वोट, आपली ताकद
आपले वोट, आपली ताकद
आपले वोट, आपली ताकद
आपले वोट, आपली ताकद
See all

आपले वोट, आपली ताकद

घाटकोपर - अवघ्या काही महिन्यात पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या उद्देशाने घाटकोपरमधील लक्ष्मीचंद गोलवाला वाणिज्य,अर्थशास्त्र महाविद्यालय आणि पालिका निवडणूक विभागाच्या वतीने सोमवारी ‘मतदार जनजागृती रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष धिरुभाई मेहताच्या हस्ते करण्यात आले. या रॅलीची सुरूवात कॉलेजच्या आवारातून करण्यात आली होती. गुरूकूल महाविद्यालयाच्या आवारात समाप्त करण्यात आली. या रॅलीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘आपका वोट आपकी ताकत’, ‘जबाबदार मतदार हा लोकशाहीचा कणा.. !’, मतदार नोंदणी करणे आपले कर्तव्य म्हणा..!’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत एकूण २,४०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

Loading Comments