Advertisement

'मुंबईतील मतदार यादीत घोटाळा'


SHARES

मुंबई - महापालिका निवडणूक तोंडावर असताना मुंबईतील मतदार यादीत घोटाळा झालाय, असा आरोप मुबई महिला काँगेसच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. चक्क प्रभाग रचनेत सत्ताधारी पक्षाने हस्तक्षेप करत अनुकूल प्रभाग बनवून घेतले. तसेच आता या पक्षांनी मतदारांचीही अदलाबदली केली आहे. प्रारूप मतदार यादीत आणि आता बनवलेल्या अंतिम यादीतच घोळ आहे. त्यामुळे मतदारांचे नाव एका यादीत आणि कार्ड दुसरीकडचे असे प्रकार घडले आहेत, असा आरोप शीतल म्हात्रेंनी केला.

बोरिवलीतील 7 आणि 8 या प्रभागातील मतदारांचा समावेश दहिसरमधील प्रभाग एकमध्ये केला आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा म्हणून हा प्रयत्न शिवसेना आणि भाजपाने प्रशासनाला हाताशी धरुन केलाय, असा आरोपही म्हात्रे यांनी केला. मतदार यादीतील घोळासंदर्भात उच्च न्यायालयातच सात ते आठ याचिका आहेत. यावरूनच यामध्ये असंख्य चुका असल्याचे शीतल म्हात्रेंचे म्हणणे आहे

शिवसेना आणि भाजपाला भीती वाटल्यामुळे त्यांनी मतदार यादीत घोळ केला आहे. त्यामुळे या सुधारणा होईपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे शीतल म्हात्रे यांनी केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा