Advertisement

राज्य खड्डेमुक्त करण्यासाठी मंत्रालयात 'वॉररूम'


राज्य खड्डेमुक्त करण्यासाठी मंत्रालयात 'वॉररूम'
SHARES

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था सध्या राज्यातील सर्वच रस्त्यांची झाल्याचं पहायला मिळत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे. मात्र टीकेचे धनी झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता खड्डेमुक्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे.


वॉररूम कुठे?

राज्याला खड्डेमुक्त करण्यासाठी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात वॉररूम उभारण्यात आली असून, याद्वारे राज्यभरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा लाइव्ह आढावा घेतला जाणार आहे.


१५ डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देत रस्त्यांचा दोष फक्त ठेकेदारांवरच नाही तर अधिकाऱ्यांवरही आहे. गेल्या तीन वर्षात यासबंधी वेगवेगळ्या कारणामुळे २०० अधिकारी निलंबित केलं.

- चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री


काय आहे वॉररूम?

सध्या राज्यभरात विभागनिहाय रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे जोरात सुरू आहेत. १५ डिसेंबरचे खड्डेमुक्त महाराष्ट्राचे मिशन पूर्ण करण्यासाठी आणि राज्यभरात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाटील यांच्या कार्यालयात वॉररूम उभारण्यात आली आहे. या ठिकाणी राज्यातील सर्व ठिकाणच्या कामाचे लाइव्ह अपडेट घेतलं जात असून, काम सुरु असलेल्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी रोज थेट कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला जात आहे.

या रूममधून रोज दैनंदिन किती रस्ते झाले? कुठे काम सुरु आहे? याचा आढावा घेतला जाणार आहे. सोबतच चंद्रकात पाटील यांच्या ट्वीटरवरून झालेल्या कामाचे फोटो शेयर केले जात आहेत.


रस्त्यांची स्थिती काय?

राज्यात ३.५० लाख किमी रस्ते आहेत. यापैकी ९७ हजार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. ३ वर्षांआधी ५ हजार किमी अंतराचे राष्ट्रीय महामार्ग होते. ते आता २२ हजार किलोमीटर अंतराचे झाले आहेत. या रस्त्यांसाठी १ लाख ६ हजार कोटी रुपये केंद्राकडून मिळणार आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खड्डे किंवा रस्ते सुस्थितीत करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग करेल, असं पाटील म्हणाले.


'त्यांनी' १५ वर्षांत काय केलं?

गेले काही दिवस अपुऱ्या माहितीच्या आधारे माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका केली जात आहे. खड्डेमुक्तीसाठी आधीच्या सरकारने निधी का नाही वाढवला? असा सवाल करत पाटील यांनी बजेट फुगवून निकृष्ट दर्जाची कामी केल्याचा आरोप केला. जे टीका करत आहेत त्यांनी १५ वर्षांत काय केल? रस्त्याची मूलभूत कामे का केली नाहीत? असा प्रश्न विचारत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पलटवार केला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा