भाजपात दिलीप पटेल विरुध्द समीर देसाई

 Goregaon
भाजपात दिलीप पटेल विरुध्द समीर देसाई
Goregaon , Mumbai  -  

गोरेगाव - मुंबई महानगर पालिकेत स्वबळाच्या तयारीला भाजपा लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय. असं झालं तर गोरेगाव पश्चिममधील वॉर्ड क्रमांक 58 मध्ये भाजपा-शिवसेना-काँग्रेस यांच्यात तिरंगी लढाई पाहायला मिळणार आहे. सध्या या वॉर्डमध्ये विद्यमान नगरसेवक दिलीप पटेल आणि काँग्रेसमधून भाजपात आलेले समीर देसाई यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस लागली आहे. वॉर्ड क्र. 58 मध्ये जवाहरनगर, सिद्दार्थनगर, मोतीलालनगर, बेस्ट कॉलनी, अमृतनगर, राम मंदीर परिसर येतो. यापैकी निम्म्याहून अधिक परिसरात दिलीप पटेल यांचा दांडगा जनसंपर्क आहे. तर समीर देसाईंसाठी हा नवीन वॉर्ड आहे. दोनवेळा वॉर्ड 56 मधून समीर देसाईचा पराभव झाला होता. मात्र यंदा ते वॉर्ड 58 मधून निवडणुक लढण्यास उत्सुक आहेत.

Loading Comments