अजंता यादव यांची नव्या वॉर्डसाठी शोधाशोध

  Damu Nagar
  अजंता यादव यांची नव्या वॉर्डसाठी शोधाशोध
  मुंबई  -  

  दामूनगर - आर दक्षिण पालिका निवडणूक म्हणजे प्रत्येक नगरसेवकासाठी नवीन गणित. त्यात दामूनगर कांदिवली येथील क्रमांक 26 आणि पूर्वीचा 25 क्रमांक आता अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने नगरसेविका अजंता यादव यांचा मात्र पत्ता कट झालाय. काँग्रेसच्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून स्थानिकांना माहिती असणाऱ्या अजंता यादव 2, 568 मतांनी निवडून आल्या होत्या. मात्र आता वॉर्ड आरक्षित झाल्यानं त्यांचं लक्ष लगतच्या समातानागर- ठाकूर व्हिलेज 25 क्रंमाक तसंच पी उत्तर 39 या महिलांसाठी खुल्या वॉर्डवर असल्याचं समजतं. काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या यादव यांना हव्या असलेल्या जागेवर तिकीट मिळण्यात काही अडचण नसल्याचंही समजतं. रामेशसिंग ठाकूर यांच्या भाजप प्रवेशानंतर काँगेसचं कमजोर झालेलं पारडं किती जोर धरतं यावर उमेदवारांची दावेदारी ठरणार आहे त्यामुळे यादव यांना नवीन प्रभागासाठी जोरदार फिल्डिंग लावावी लागेल हे नक्की. मुंबई लाइव्हशी बोलताना त्यांनी, सध्या काही बोलणं उचित ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.