अखंड हिंद पार्टी निवडणुकीच्या आखाड्यात

  Fort
  अखंड हिंद पार्टी निवडणुकीच्या आखाड्यात
  मुंबई  -  

  सीएसटी - अंखंड हिंद पार्टी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती अखंड हिंद पार्टीचे संस्थापक हितेंद्र ठाकूर यांनी दिली. भाजपाचे कांदीवली भाजपा तालुका महासचिव दुर्गेश प्रल्हाद सिंग यांनी अखंड हिंद पार्टीत प्रवेश केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दहीसर वॉर्ड प्रभागात 5 ते 6 जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. भाजपा आणि काँग्रेसने महाराष्ट्रात लबाडखोरी केली असून, दोन्ही पक्षांना मुळापासून काढून टाकण्याचे काम आम्ही करणार असल्याचे ठाकूर यावेळी म्हणाले.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोट बंदी करून 100 पेक्षा जास्त लोकांची हत्या केलेली आहे आणि 50 दिवसांत देशात मोठा नरसंहार केला. यासाठी पंतप्रधान यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रपतींकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे ठाकूर यांनी म्हटले. महाराष्ट्रात भाजपा सरकारला दोन वर्ष पूर्ण झालेली असून, मुख्यमंत्री फक्त आश्वासन देत आहेत. पण त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.