संभाजी ब्रिगेडची राजकीय एन्ट्री

मुंबई - राजकीय पटलावर आता एक नवा पक्ष उदयास आलाय. या नव्या पक्षाचं नाव आहे संभाजी ब्रिगेड. आजवर राजकारणात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा घुमत होत्या. मात्र आता जय जिजाऊ जय शिवारायची ललकारीही ऐकायला मिळणारेय.

संभाजी ब्रिगेडच्या एन्ट्रीनं प्रस्थापित पक्षांना विचार करायला लावला हे मात्र नक्की. आता जरी प्रस्थापित पक्ष संभाजी ब्रिगेडच्या एन्ट्रीचं स्वागत करत असले तरी भविष्यात धोका निर्माण होऊ नये याची काळजी ते नक्की घेतील.

संभाजी ब्रिगेडनं मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय एन्ट्री केलीय. मात्र निवडणुकीत संभाजी ब्रिगेड काय करिष्मा दाखवतंय आणि कुणाचे बुरूज ढासळतायेत याचं उत्तर पालिका निवडणुकीच्या निकाला नंतरच कळेल. तूर्तास तरी प्रस्थापित पक्षांची या एन्ट्रीन झोप उडाली हे मात्र नक्की.

Loading Comments