Advertisement

'एका आठवड्यात पाण्याचा प्रश्न सुटणार'


'एका आठवड्यात पाण्याचा प्रश्न सुटणार'
SHARES

गोरेगाव - गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगाव पूर्वेकडच्या एसआरपीमधील रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. येथील पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी गट परिसरातील इमारतींची दुरुस्ती, रस्त्यांची दुरवस्था यासंदर्भात प्राप्त झालेल्या निवेदनानंतर राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी या वसाहतींची पाहणी केली.

पाहणीनंतर पार पडलेल्या बैठकीत राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 8चे पोलीस अधिकारी महेश घुर्ये यांनी या वसाहतीतील रहिवाशांच्या समस्या वायकरांच्या पुढे मांडल्या.
या वेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ७ दिवसात तत्काळ सोडवण्यात येईल, वसाहतीच्या आवारात सोलर लाईट बसविण्यासाठी आमदार निधीतून रुपये १० लाख देण्याचंही वायकर यांनी मान्य केलं. तलावाचं नाविन्यपूर्ण योजनेतून सुशोभिकरण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही सबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर महिलांची तसेच पुरुषांसाठी स्वच्छतागृह तत्काळ बांधण्यात येईल, असं आश्‍वासनही राज्यमंत्री वायकर यांनी या वेळी दिलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा