‘भाऊं’चे निरुप(म)ण

  मुंबई  -  

  दादर - मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगूल वाजले आणि शिवसेना-भाजपा युतीची चर्चा रंगात असतानाच काँग्रेसने ‘हाताला घड्याळ नको’ अशी भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मात्र आम्हाला आघाडी हवी होती, अशी प्रतिक्रिया ‘मुंबई लाइव्ह’च्या 'उंगली उठाओ' या कार्यक्रमात दिली आहे. त्याही पुढे जाऊन मोठ्या भावासाठी अर्थात काँग्रेससाठी दोन-चार काय दहा पावले मागे येण्याची आमची तयारी होती असे ते म्हणाले. 15 वर्षे सत्तेत एकत्र नांदत असताना आम्ही अनेकदा हीच भूमिका घेतली होती हेही सांगायला ते विसरले नाहीत. स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला शुभेच्छा देताना काँग्रेसवर उपहासात्मक टीका करण्याची संधीही त्यांनी या वेळी सोडली नाही.

  गेली 15 वर्षे आम्ही सत्तेत राहिल्यामुळे संघटनात्मक पातळीवर आमच्यात काही उणिवा राहिल्या होत्या, पण गेली दोन वर्षे आम्ही आता त्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले. मुंबईतील आमची ताकद काय आहे, याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याचे भान ठेवूनच आम्ही लढणार आहोत, उगाच अवास्तव अपेक्षा आम्ही ठेवलेल्या नाहीत अशी प्रामाणिक कबुली अहिर यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.