Advertisement

शिवसेनेला फसवलं, आम्ही चुकलो, भाजपची पहिल्यांदाच जाहीर कबुली

आम्ही शिवसेनेला फसवलं, ही चूक झाली, अशा शब्दांत भाजपने जाहीर कबुली दिली आहे. भाजपनचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (bjp mla sudhir mungantiwar) विधानसभेत आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला.

शिवसेनेला फसवलं, आम्ही चुकलो, भाजपची पहिल्यांदाच जाहीर कबुली
SHARES

विधानसभा निवडणुकीनंतर (maharashtra vidhan sabha election) शिवसेनेला (shiv sena) कुठलाही शब्द दिला नव्हता, या वक्तव्यावर ठाम असलेल्या भाजपने (bjp) अखेर आम्ही शिवसेनेला फसवलं, ही चूक झाली, अशा शब्दांत जाहीर कबुली दिली आहे. भाजपनचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (bjp mla sudhir mungantiwar) विधानसभेत आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला.  

हेही वाचा- शरद पवारांपेक्षा पाचपट श्रीमंत सुप्रिया सुळे

काय म्हणाले मुनगंटीवार?

अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना मुनगंटीवार (bjp mla sudhir mungantiwar) यांनी हे विधान केलं. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray), भाजप अध्यक्ष अमित शहा (amit shah) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यात मातोश्रीवरील बैठकीत जे ठरलं त्यापासून फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी फारकत घेतली. भाजपने शिवसेनेला दिलेला शब्दच पाळला नाही. त्यामुळे आमच्या चुकीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी ठरलं होतं तो शब्द आम्ही पाळला असता, तर आज शिवसेनेसोबत आमची सत्ता असती. आम्ही त्यांना फसवलं, आमची चूक झाली. पण एक ना एक दिवस ती चूक आम्ही सुधारू. उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची ३ महिन्यांची मैत्री असेल, तर आमची मैत्री ३० वर्षांपासूनची जुनी आहे, हे विसरू नका, असं ते म्हणाले.  

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप (bjp shiv sena alliance) युतीला १६१ जागा मिळूनही सत्ता स्थापन करता आली नाही.   मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा मिळावा या मागणीवर शिवसेना अडून बसली होती. परंतु भाजपने असा कुठलाही शब्द दिलाच नव्हता, असं म्हणत शिवसेनेला साइडलाइन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हाती बहुमत असूनही महायुतीला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही. अखेर शिवसेनेने (shiv sena) राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेसला (congress) हाती धरून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (maha vikas aghadi government) स्थापन केलं. परंतु भाजपने शिवसेनेला सत्तेत निम्मा वाटा देण्याचं आश्वासन दिलं होतं की नाही, यावर सस्पेन्स कायम होतं. त्यावरचा पडदा अखेर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर दूर झाला आहे. 

हेही वाचा- आता गो.. महाविकास आघाडी गो… म्हणणार- रामदास आठवले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा