Advertisement

आता गो.. महाविकास आघाडी गो… म्हणणार- रामदास आठवले

गो कोरोना गो… म्हणत अख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेणारे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (bjp rajya sabha candidate ramdas athawale) यांनी गुरूवारी राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरला.

आता गो.. महाविकास आघाडी गो… म्हणणार- रामदास आठवले
SHARES

गो कोरोना गो… म्हणत अख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेणारे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (bjp rajya sabha candidate ramdas athawale) यांनी गुरूवारी राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळी गो कोरोना बरोबरच मी आता गो महाविकास आघाडी गो असंही म्हणणार असल्याचं सांगितलं. 

भाजपने बुधवारी रामदास आठवले (ramdas athawale) यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर आठवले यांनी आपले कुटुंबिय आणि कार्यकर्त्यांसोबत विधान भवनात जाऊन उमेदवारीचा अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाध साधताना कोरोना व्हायरस आणि महाविकास आघाडी सरकारवर भाष्य केलं. 

हेही वाचा- राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे भडकले

आठवले म्हणाले, मी करोनाला (coronavirus) गो म्हटल्यानेच तो देशात आणि महाराष्ट्रात जास्त प्रमाणात पसरलेला नाही. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. तसंच प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवरही खबरदारी घेतली पाहिजे. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन केलं पाहिजे. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आळून आल्यावर डाॅक्टरांकडे धाव घेतली पाहिजे. गर्दीत जाण्याचं टाळलं पाहिजे. 

जोपर्यंत देशातून कोरोना पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत मी गो कोरोना (go corona go) म्हणतच राहणार आहे. तसंच महाविकास आघाडी गो (maha vikas aghadi) असंही म्हणणार आहे, असं आठवले म्हणाले.

रामदास आठवले यांच्यासोबत भाजपकडून उदयनराजे भोसले यांनीही भाजपकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला. 

आठवले यांनी काही दिवसांपूर्वी काही चिनी लोकांसोबत गो कोरोना गो… चा नारा दिला होता. यावरून सोशल मीडियावर आठवले यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांच्या मिम्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.  

हेही वाचा- राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा