Advertisement

शरद पवारांपेक्षा पाचपट श्रीमंत सुप्रिया सुळे

पवार यांची ही संपत्ती त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीच्या केवळ २0 टक्के आहे

शरद पवारांपेक्षा पाचपट श्रीमंत सुप्रिया सुळे
SHARES

देशभरात राज्यसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलं गेलं असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवार यांनी आपल्या संपत्तीबाबतचं प्रतिज्ञापत्रक सादर केलं आहे. यातून शरद पवार यांच्याकडे एकूण ३२.५ कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. पवार यांची ही संपत्ती त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीच्या केवळ २0 टक्के आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी २0१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी संपत्तीबाबतचं प्रतिज्ञापत्रक सादर केलं. या प्रतिज्ञापत्रकानुसार सुप्रिया सुळे, त्यांचे पती आणि मुलं यांच्याकडे एकूण १६५.४ कोटींची मालमत्ता आहे


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यसभेसाठी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईमध्ये विधानभवनात त्यांनी आपला अर्ज भरला. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवार यांनी आपल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचाही उल्लेख केलाय. यामध्ये, गेल्या सहा वर्षांत शरद पवार यांची संपत्ती ६0 लाखांनी वाढल्याचे दिसते. शपथपत्रात शरद पवार यांनी आपली ३२.७३ करोड रुपयांची एकूण मिळकत जाहीर केली आहे. यामध्ये २५,२१,३३,३२९ रुपयांची जंगम आणि २,५२,३३,९४१ रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. तसेच, पवारांनी आपल्या एक करोड रुपयांचे ऋण असल्याचंही या शपथपत्रात नमूद केले. प्रतिभा पवार यांचा अँडव्हान्स डिपॉझिट म्हणून ५0 लाख रुपये मिळाल्याचंही त्यांनी शपथपत्रात नमूद केले. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून शेअर ट्रान्सफरसाठी हे पैसे मिळाल्याचं त्यांनी म्हटले. तसेच हिंदू अविभाजीत कुटुंब नियमाप्रमाणे, शरद पवार यांना अँडव्हान्स डिपॉझिट म्हणून नातू - अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याच्याकडून ५0 लाख रुपये मिळाल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद केले. २0१४ च्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रात पवारांनी २0,४७,९९,९७0.४१ रुपयांची जंगम मालमत्ता आणि ११,६५,१६,२९0 रुपयांची स्थावर मालमत्ता अशी मिळून ३२.१३ कोटींची संपत्ती जाहीर केली होती.पवार यांची ही संपत्ती त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीच्या केवळ २0 टक्के आहे.

हेही वाचाः- राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे भडकले

खासदार सुप्रीया सुळे यांचे कुटुंबीय अब्जाधीश असून, सुळे कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे १६५ कोटी ४२ लाख ८९ हजार रुपयांच्या घरात पोहोचली आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नात ३२ कोटी रुपयांची भर पडली आहे. सुळे कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न सरासरी ६.४१ कोटी रुपये असूनही त्यांनी आपले बंधू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्याकडून ५५ लाख रुपये उसने घेतल्याचे त्यांनी लोकसभेला दाखल केलेल्या शपत पत्रात म्हटलं होते.  नावावर १३३.३६ कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता एकूण ४६ कोटी नऊ लाख ५८ हजार रुपये होती. सदानंद सुळे यांच्याकडे ८४ कोटी ४५ लाख ५० हजार रुपये, रेवतीच्या नावावर एक कोटी ४३ लाख ३० हजार आणि विजयच्या नावावर एक कोटी ४६ लाख ९६ हजार रुपये दाखविण्यात आले होते. याचाच अर्थ सुळे कुटुंबीयांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत सुमारे ३२ कोटी रुपयांची भर पडली आहे. सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्याकडे अनुक्रमे  २८ हजार ७७० आणि  २३ हजार ५० रुपये रोख रक्कम आहे. सुप्रिया यांच्याकडे दोन कोटी ८३ लाख २० हजार रुपयांच्या मुदत ठेवी असून, त्यांनी समभागांमध्ये सात कोटी ७७ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. या शिवाय राष्ट्रीय बचत योजना आणि पोस्टाच्या योजनांमध्ये सुमारे सात लाख १३ हजार ५०० रुपये गुंतविले आहेत.

हेही वाचाः- CoronaVirus: कोरोनाचा फटका आता आंबा निर्यातीवरही


राज्यसभा निवडणूक प्रक्रिया

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा रिकाम्या होत आहेत, त्याचीच निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी १३ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याचा करण्यासाठी शेवटची तारीख आहे. या उमेदवारी अर्जांची पडताळणी १६ मार्च रोजी होणार आहे. १८ मार्चपयर्ंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रात एका आमदाराच्या मताचं मूल्य १00 मतं आहे. महाराष्ट्रात एकूण २८८ आमदार आहेत. या हिशोबानं २८,८00 मतं होतात. राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका उमेदवाराला ३६0१ मतांची आवश्यकता असते. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहत भाजप ३, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेत सहजच दाखल होऊ शकतील.


महाराष्ट्र विधानसभेचे संख्याबळ

भाजप - १0५, शिवसेना - ५६, राष्ट्रवादी - ५४ काँग्रेस - ४४, इतर - २९

संबंधित विषय
Advertisement