'राष्ट्रवादीची स्वबळावर लढण्याची तयारी'

    Pali Hill
    'राष्ट्रवादीची स्वबळावर लढण्याची तयारी'
    मुंबई  -  

    मुंबई - आगामी 2017 ची मुंबई महापालिका निवडणुकीत 227 जागा स्वबळावर लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेस सोबत वेळेवर आघाडी झाली नाही, तर राष्ट्रवादी 227 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.

    मुंबई महानगरपालिका निवडणूक लढण्याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत एकत्र बोलणी केली जाणार नाही, एका मर्यादीत वेळेपर्यंत आघाडीसाठी वाट पाहीली जाणार आहे, असे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले आहे. तर वॉर्ड रचना निवडणूक आयोगाची प्रक्रिया असली, तरी ज्या पध्दतीने शिवसेनेची गोची झाली आहे, त्यामुळे यामागे भाजपचा हात असल्याच्या संशयाला वाव असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.