'भाजपला मतदान करणार नाही'

  Fort
  'भाजपला मतदान करणार नाही'
  मुंबई  -  

  सीएसटी - अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा आराखडा बनवून राज्य सरकारनं मच्छीमारांना देशोधोडीला लावण्याचा घाट घातलाय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मच्छीमार भाजपा उमेदवारांना मतदान करणार नाहीत, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिलाय. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते .

  शिवसस्मारकाला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना नव्हे तर अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी निवडलेल्या जागेला अामचा विरोध असल्याचं तांडेल यांनी म्हटलंय. अरबी समुद्रातील खडकाळ जागेला बेट सांगून शासन पर्यावरण खात्याची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
  या स्मारकासाठी होणार्‍या निधीमध्ये टक्केवारी ठरलेली अाहे, असा आरोप करतानाच शिवस्मारक अरबी समुद्राऐवजी महालक्ष्मी रेसकोर्स येथील मैदानात उभारावं, अशी मागणीही त्यांनी केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक स्मारक उद् घाटन सोहळ्यास मच्छीमार संघटना ५ हजार बोटींसह विरोध करेल असं सांगतानाच शिवस्मारकाच्या बांधकामामुळे मुंबईच्या किनार्‍याला धोका निर्माण होईल. तसंच कफपरेड आणि ससून डाॅक भागातला मासेमारी व्यवसायही बंद होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.