'मुंबईची अब्रू घालवणाऱ्यांना मुंबईत सत्ता मिळणार नाही'

  Mumbai
  'मुंबईची अब्रू घालवणाऱ्यांना मुंबईत सत्ता मिळणार नाही'
  मुंबई  -  

  लालबाग - ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहात, ज्या राज्याच्या राजधानीत बसून तुम्ही पूर्णपणे राज्यकारभार चालवता. अश्या या माझ्या मुंबईला तुम्ही पाटणा केलं असं म्हणून बदनाम करता. मुंबईचे जगात, देशात आणि राज्यात काय चित्र निर्माण झाले असेल या मुंबईची अब्रू पाटणा म्हणून घालवणाऱ्यांना सत्ता मिळणार नाही. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी लालबागच्या सभेत भाजपावर टिकास्त्र सोडलं.

  युती तुटली म्हणून मी मुख्यमंत्री झालो असं मुख्यमंत्री म्हणतात. पण, शिवसेनेचा टेकू होता म्हणून मुख्यमंत्री पद मिळाले हे सत्य आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना कायम आश्वासनं दिली. पण, मुंबईचा ‘पाटणा’ उल्लेख करुन त्यांनी पोलिसांचा अपमान केला. आता सर्व गुंडाना पक्षात भरती केले आहे.

  पन्नास वर्षाच्या सत्तेत 25 वर्षे नागोबा जपला. मात्र, आज या नागोबाला मोकळा सोडला. कारण वाघाचा तडाका काय असतो ते कळेल. महाराष्ट्र, मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यातून हा लालबाग परळ यामध्ये किल्ल्यावर शिवसेनेचा झेंडा आणि धनुष्य निशाणी याशिवाय काहीही चालत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसंच सभेत त्यांनी शिवसेनेने मुंबईत केलेल्या कामांचा आढावाही वाचून दाखवला.

  माझ्या महापालिकेत कोणीही आणि काहीही कमी नाही एवढी सक्षम महापालिका आहे. मात्र माझ्या माणसांना जो त्रास देईल अशा वेळी सत्ता असो वा खुर्ची असो मी त्याला लात मारेन असेही उद्धव म्हणाले. थापा मारुन आम्ही मतं मागितली नाहीत आणि मागणार नाही. असंही उद्धव ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केलं.

  स्वच्छ भारत अभियान राबवितात पण कपड्यावर एक डाग किंवा सुरकुती नाही. केवळ फलक आणि छायाचित्रांमध्ये स्वच्छ भारत अभियान. वेळप्रसंगी रक्तदान करायला शिवसैनिकच पुढे असतो. भाजपा तीर्थप्रसाद घ्यायला फिरत असतात. नोटाबंदी लादणारे तुम्ही, पण नोटाबंदीमुळे बँकेच्या लाईनमध्ये त्रस्त झालेल्यांना पाणी देणारे आम्ही. पारदर्शक कारभार इतका कि अजून नागरिकांच्या बँकेत 15 लाख रुपये आलेले पैसे दिसत नाहीत अशा टिकाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी भाजपावर केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.