Advertisement

जनतेचा कौल पारदर्शकतेला - देवेंद्र फडणवीस


SHARES

मुंबई - महापालिकेतील निकाल समोर आल्यानंतर मुख्यमंत्री भाजपा कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवात सहभागी झाले. जनतेने विकासाला आणि पारदर्शकतेला मत दिल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले. महाराष्ट्राने भाजपाच्या कामावर मोहोर उमटवली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एखाद्या निवडणुकीत परफॉर्ममन्स चांगला असतो-नसतो. मात्र, राजीनामा मिळाला, तरी तो स्वीकारणार नाही, असे पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले. तर मुंबई महापालिकेत पुढे काय करायचं, याचा निर्णय कोअर कमिटीत घेऊ, असेही त्यांनी सांगितले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही यावेळी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement