लग्नाच्या दिवशी केले मतदान

    मुंबई  -  

    मुलुंड - मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा अखेर दिवस उजाडला आणि मतदार राजाने आपला मतदानाचा हक्क बजावला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनीषा फुलपगार. 21 फेब्रुवारी रोजी मनीषाचं लग्न आणि नेमकं याच दिवशी मुंबई महानगरपालिका निवडणुका. अशी एकूण परिस्थिती मनीषा समोर निर्माण झाली होती. परंतु तरीही स्वतःच्या लग्नाच्या दिवशी मनीषाने मतदान करण्याचा निर्णय घेतला. वॉर्ड क्रमांक 103 मधील दीनदयाळ उपाध्ये महानगरपालिका हायस्कुल या मतदान केंद्रात जाऊन तिने मतदानाचा हक्क बजावला. संध्याकाळी 5.30 चा मुहूर्त असतानाही वेळ काढून तिने मतदानाचा हक्क बजावला.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.