Advertisement

अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मारेकरी मॉरीस भाई यांचा संबध काय?

मॉरीस भाई आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात काय वाद होता? याही चर्चा रंगल्या आहेत\

अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मारेकरी मॉरीस भाई यांचा संबध काय?
SHARES

गुरुवारी मुंबईतल्या दहिसरमध्ये (Dahisar) एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये ठाकरे गटाचे (Thackeray) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर फेसबुक लाईव्ह (Facebook Live) सुरू असतानाच गोळीबार करण्यात आला. धक्कादयाक म्हणजे गोळीबार करणारा मॉरीस स्वत: त्यांच्या बाजूलाच बसलेला होता. लाईव्हमध्ये हसत खेळत असणाऱ्या मॉरीसने दुसऱ्या क्षणी त्यांच्यावर हल्ला केल्याचे धक्कादायक दृश्य कॅमेरात कैद झाले. (Abhishek Ghosalkar Firing Case Live Updates)

त्याहून धक्कादायक हे की अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला केल्यानंतर स्वत: मॉरीसने स्वत: आत्हमत्या केली. या घटनेनंतर मॉरीस भाई (Maurice Bhai) कोण याची चर्चा तर रंगलीच. शिवाय मॉरीस भाई आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात काय संबंध होते? याही चर्चा सुरू झाल्या. 

अभिषेक घोसाळकर कोण होते? 

अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकरांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबईतल्या दहीसरच्या कांदरपाडा प्रभागाचे नगरसेवक आहेत. घोसाळकर हे दोन वेळा नगरसेवक होते. ते मुंबै बँकेचे संचालकदेखील आहेत. सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या नगरसेविका आहेत. बोरीवली मतदार संघात घोसाळकर कुटुंबाचा मोठा  राजकीय दबदबा आहे.  

अभिषेक घोसाळकर आणि मॉरीस भाईत काय संबंध होते?

अभिषेक घोसाळकर आणि  मॉरीस भाई दोघांमध्ये वैर होते असे बोलले जाते. दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. राजकीय तसेच मालमत्ता यांचातून त्यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा आहे. 

काही दिवसपांपूर्वी दोघांनी वैर विसरुन एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी दोघांनी एकत्र फेसबुक लाईव्ह केले. या फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळीबाराचा थरार घडला. यांच्या फेसबुक लाईव्हच्या संवादाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.  या व्हिडिओत मॉरिसभाईही फेसबुक लाईव्हमधून संवाद साधताना दिसत आहे. 

फेसबुक लाईव्ह सुरूअसतानाच गोळीबार

यात मौरीस भाई म्हणतोय की, आपण एकत्र येऊन चांगलं काम केलं पाहिजे. यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, आम्ही साडी, रेशन वाटप करण्याचं ठरवलं आहे. याशिवाय अभिषेकभाई आणि मी नाशिक ट्रिपसाठी बसेस आयोजित करणार आहोत, असं मॉरिसभाई म्हणतोय. फेसबूक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकर मुंबई ते नाशिकआणि नाशिक ते मुंबई बसेस सोडण्याविषयी सांगत होते.

तसंच सर्वांनी एकत्र काम करुयात असंही म्हणताना दिसातयत. आयसी कॉलनी, गणपत नगर, कांदळपाडा परिसरात चांगलं काम करायचं आहे. ही सुरुवात आहे, पुढे अजून काम करायचं आहे असंही अभिषेक घोसाळकर म्हणताना दिसतायत. आपलं भाषण संपवून ते तिथू उठले तितक्यात त्यांच्यावर मॉरीसने गोळीबार केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.हेही वाचा

महाराष्ट्राचा UP, बिहार होतोय का?

ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालणारा मौरिस भाई कोण होता?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा