या भेटी मागे दडलंय काय?

  Mumbai
  या भेटी मागे दडलंय काय?
  मुंबई  -  

  मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मुलाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन बुधवारी मातोश्रीवर गेल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. मंगळवारी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदानानंतर विविध एक्झिट पोल समोर आले त्यामध्ये स्पष्ट बहुमत कुणालाचा नसून, शिवसेना नंबरवन पक्ष तर भाजपा दुसऱ्या स्थानावर राहणार असल्याचा अंदाज या पोलनी वर्तवला आहे. या पोलच्या अंदाजानंतर सत्तेसाठी शिवसेना-भाजपा एकत्र येतील अशा चर्चा आहे. त्यातच बुधवारी रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने या भेटी मागे नेमकं दडलंय तरी काय अशा उलटसुलट चर्चा होऊ लागल्यात. त्यामुळे ही भेट सध्या जरी मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देणारी असली तरी देखील निकालाच्या आदल्या दिवशी घेतलेल्या या भेटीमुळे एक ना अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.