दादर - भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर पोहोचले. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रुत आहे, मात्र मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशीष शेलार नेहमीच शिवसेनावर टीका करत असतात, त्यामुळे शिवसेनेला खिजवण्यासाठी ही भेट असू शकते, असं सूत्रांकडून सांगण्यात येतंय...