Advertisement

विधानभवनामधील लिफ्ट अचानक पडली बंद


विधानभवनामधील लिफ्ट अचानक पडली बंद
SHARES

मुंबई - विधानभवनामध्ये दुपारी दीडच्या सुमारास अचानक लिफ्ट बंद पडली. ही लिफ्ट विधानभवनामधील इमारतीच्या 20 व्या मजल्यावरून तळ मजल्यावर येत असताना चौथ्या मजल्यावर बंद पडली.

लिफ्ट बंद पडण्याच्या अगोदर चौथ्या मजल्यावर असलेले भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी तळ मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये प्रवेश केला होता. लिफ्टची क्षमता 15 व्यक्तींची असूनही अदांजे 8 जण असताना लिफ्टचे दरवाजे बंद झाले नाहीत. लिफ्टमनने इतर व्यक्तींना बाहेर काढून लिफ्टमधील वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, तरीही काहीच फायदा झाला नाही. लिफ्टचे दरवाजे जबरदस्ती बंद करण्याचा प्रयत्नही लिफ्टमनने करून पाहिला तरीही यश आले नाही. लिफ्ट बंद झाल्याने आमदार किसन कथोरेंसहित इतर लोकांनी लिफ्टमधून बाहेर पडणे पसंद केले. लिफ्टमधून बाहेर आलेले मनोमनी हीच प्रार्थना करत होते की लिफ्टचे दरवाजे बंद होण्यापूर्वी लिफ्टमध्ये बिघाड झाला ते बरे झाले, नाहीतर लिफ्टचे दरवाजे बंद झाल्यानंतर लिफ्टमध्ये बिघाड झाला असता तर दुर्घटना घडली असती. दुपारी झालेल्या घटनेची माहिती विधानभवनाच्या अग्निशमन केंद्राने शिंडलर कंपनीच्या अभियंत्यांना कळवली आणि काही वेळाने लिफ्टमधील बिघाड दूर करून लिफ्ट पूर्ववत करण्यात आली. स्विझर्लंडमधील शिंडलर कंपनीच्या लिफ्टस विधानभवनामध्ये लावण्यात आल्या आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा