किंगमेकर कोण ठरणार?

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-सेना युती तुटल्यामुळे सत्तेत कोण येणार ? महापौर कुणाचा असणार ? कोण कुणासाठी किंग मेकर ठरणार ? हे आणि असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात निर्माण झालेत. कोण कुणासाठी किंग मेकर ठरणार यावर आज मुंबईतल्या मतदार राजाने कौल दिलाय.

सध्या मुंबईत महापौर येण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सत्तेत येण्यासाठी प्रत्येक पक्षाला इतर पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. सध्या 31 जागा काँग्रेस, 9 जागा एनसीपी, तर 7 जागेवर मनसेचे नगरसेवक असल्यामुळे सध्या भाजपा किंवा शिवसेनेसाठी कोण किंग मेकर ठरेल आणि योग्य किंग मेकर कोण यावर मुंबईतल्या जनतेने आज मत व्यक्त केलंय.

मनसे शिवसेनेचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे आणि मराठी अस्मितेचा मुद्दा दोघांचाही सारखा असल्यामुळे मनसे किंग मेकर होईल तर 31 जागा काँग्रेसकडे असल्यामुळे शिवसेनेसाठी काँग्रेस किंग मेकर होईल अशा संमिश्र प्रतिकिया मुंबईकरांनी या वेळी व्यक्त केल्या आहेत.

Loading Comments