Advertisement

घरातच बसून मोबाईल गेम खेळणाऱ्यांचा तर हा सल्ला नाही ना?- आशिष शेलार

विनय तिवारी यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास व्हर्च्युअलीच करावा, अशी अपेक्षा आहे का? घरात बसून मोबाइल गेम खेळणाऱ्यांनी तर हा सल्ला दिला नाही ना, असा प्रश्न भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

घरातच बसून मोबाईल गेम खेळणाऱ्यांचा तर हा सल्ला नाही ना?- आशिष शेलार
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेले बिहार पोलिस दलातील अधिक्षक विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून चांगलीच टीका करण्यात येत आहे. विनय तिवारी यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास व्हर्च्युअलीच करावा, अशी अपेक्षा आहे का? घरात बसून मोबाइल गेम खेळणाऱ्यांनी तर हा सल्ला दिला नाही ना, असा प्रश्न भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. (Why bmc kept bihar police sp vinay tiwari in quarantine ask bjp mla ashish shelar)

आपल्या ट्विटर हँडलवरून आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला हाणताना आशिष शेलार म्हणाले की, व्हर्च्युअल राज्य सरकार" व "व्हर्च्युअल मुंबई पालिकेने" जसे रस्त्यावरील खड्डे व्हर्च्युअली भरले, नाल्यातील गाळ व्हर्च्युअली काढला.. सुशांत सिंह रजपूत केसचा तपास क्वारंटाईन विनय तिवारी यांनी व्हर्च्युअलीच करावा असा सल्ला दिलाय! घरातच बसून मोबाईल गेम खेळणाऱ्यांचा तर हा सल्ला नाही ना? 

हेही वाचा - न्यायालयाने नाराजी व्यक्त करूनही 'तो' अधिकारी क्वारंटाईन, बिहार पोलिस महासंचालकांकडून नाराजी

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारहून एसपी विनय तिवारी हे रविवारी मुंबईत आले. या प्रकरणाच्या तपासात ते लक्ष घालणार तोच कोरोना संक्रमण काळातील नियमानुसार, त्यांच्या हातावर १५ दिवसांचा क्वारंटाईन शिक्का मारत, त्यांना १५ आॅगस्टपर्यंत अलगीकरणातच राहण्यास सांगितलं आहे. तिवारी यांच्यानंतर तपासासाठी आलेल्या ४ अधिकाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

या प्रकरणी रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात सुशांत आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडेच ठेवण्याबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावनी दरम्यान न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत कान उपटले. तसंच महापालिकेने तपास अधिकाऱ्यांना केलेल्या क्वारंटाईनवरही नाराजी व्यक्त केली. त्यावेळी न्यायालयात केंद्र सरकार तर्फे हा गुन्हा पुढील तपासासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लिहिलेल्यापत्रानुसार सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार असल्याचं सांगितलं.  

हेही वाचा - सुशांत सिंहच्या वडिलांचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

संबंधित विषय
Advertisement