Advertisement

मुख्यमंत्र्यांनी का कापला नाही केक?


मुख्यमंत्र्यांनी का कापला नाही केक?
SHARES

मुंबईच्या गरवारे क्लब हाऊसमध्ये भाजपाच्या 37 व्या वर्धापनदिना निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोठा केकही मागवण्यात आला होता. मात्र हा केक स्वत: मुख्यमंत्री कार्यक्रमाला हजर असताना त्यांनी न कापता आमदार राज पुरोहित यांनी कापला. मुख्यमंत्र्यांनी केक का कापला नाही? याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राज पुरोहित, भाजपाचे राष्ट्रीय संघटक व्ही सतीष यांच्यासह भाजपाचे अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी मागवण्यात आलेला केक कापण्यासाठी राज पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी केक कापायला नकार दिला. आता स्वत: मुख्यमंत्री उपस्थित असताना इतर कुणी केक कापणं शिष्टाचाराला धरून झालं नसतं. मात्र मुख्यमंत्री अखेरपर्यंत केक न कापण्यावर ठाम होते. अखेर स्वत: राज पुरोहित यांनीच पुढाकार घेऊन हा केक कापला.

दरम्यान, एकीकडे केक कापण्याची तयारी सुरु असतानाच इकडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गोटात मात्र वेगळीच चर्चा सुरु होती. भाजपाचे राष्ट्रीय संघटक व्ही सतीश यांनी ज्येष्ठ मंडळींसोबत गप्पा मारताना "केक कापणं भाजपाची संस्कृती नाही" असं वक्तव्य केलं. भाजपामध्य़े व्ही सतीश यांचं महत्त्व लक्षात घेता त्यांच्या विधानाला छेद देण्याची मुख्यमंत्रीही तयारी दाखवणार नाहीत, हे उघड आहे. जी बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली तीच राजकारणात मुरल्याचा दावा करणा-या राज पुरोहित यांच्याही लक्षात आली असती, तर मात्र केक न कापताच भाजपाचा वर्धापनदिन साजरा झाला असता.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा