माजी नगरसेवकाचा शिवसेनेला रामराम

  Mumbai
  माजी नगरसेवकाचा शिवसेनेला रामराम
  मुंबई  -  

  विक्रोळी - येथील माजी नगरसेवक, विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी शिवसेनेला रामराम केला आहे. प्रभाग 123 हा महिलांसाठी आरक्षित झाला असून, या प्रभागातून माजी नगरसेवक सुधीर मोरे यांच्या छोट्या बंधुंची पत्नी स्नेलह मोरे यांना शिवसेनेतून उमेदवारी हवी होती. मात्र तिकीट न दिल्याने नाराज होत त्यांनी शिवसेनेला रामराम केला असल्याचे सुधीर मोरे यांनी सांगितले. नगरसेविका डॉ. भारती बावदाणे यांना प्रभाग 123 मधून पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यामुळे मोरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान उमेदवारी न मिळाल्यामुळे शुक्रवारी स्नेहल मोरे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.