Advertisement

शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी निसटणार? अजित पवारांचा पक्षावर दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत, असं ते म्हणाले.

शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी निसटणार? अजित पवारांचा पक्षावर दावा
SHARES

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज मोठा राजकीय भूकंप झाला. २०१९ साली सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी राज्य सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० ते ४० आमदारांचा अजित पवारांसह सरकारला पाठिंबा असल्याचं सांगितलं जातंय.

"विकासासाठी घेतला निर्णय"

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणं, केंद्राचा अधिकाधिक निधी महाराष्ट्रासाठी आणणं आणि सर्व घटकांना मदत करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. बहुतेक आमदारांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. पुढच्या सर्व निवडणुका पक्षाच्या नाव आणि चिन्हाखाली लढवणार आहोत. त्यातून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे बहुसंख्य आमदार सहभागी झालो आहोत. त्यानुसार मी आणि इतर सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली – अजित पवार

शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला - अजित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रत्येक राज्याच वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे विरोधकांच्या बैठकीतून आऊटपुट निघत नाही. भारतात खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही तसा निर्णय घेतला. शिंदे-फडणवीसांचं सरकार काम करत होतं. मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. पण शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. वर्धापन दिनी मी माझी भूमिका स्पष्ट केली होती, असंही त्यांनी स्पष्ट केले. 

"आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो, तर..." 

आम्ही जर शिवसेनेबरोबर जाऊ शकतो, तर आम्ही भाजपाबरोबरही जाऊ शकतो. नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो, तर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही इथेही त्यांच्याबरोबर जाऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.

"मोदी विदेशातही लोकप्रिय आहेत"

१९८४ सालानंतर कोणताही एक नेता देशाला पुढे घेऊन जातोय असं कधी झालं नाही. पण गेल्या ९ वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली देश आज काम करतोय. ते विदेशातही लोकप्रिय आहेत.


हेही वाचा

अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, 9 मंत्र्यांसह घेतली शपथ

राष्ट्रवादीत फुट! अजित पवारांना 'या' मोठ्या 25 आमदारांचा पाठिंबा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा