युती होणार का?

Mumbai  -  

मुंबई - महापालिका निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आणि पुन्हा एकदा भाजपाच्या लाटेचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. एक हाती सत्ता घेऊ असं म्हणणाऱ्या शिवसेनेला 84 जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपाने मुसंडी मारत 82 जागांवर विजय मिळवला. आता मुंबईत कोणाची सत्ता असणार? युती होणार की नाही होणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. यासंदर्भात ‘मुंबई लाइव्ह’ने मुंबईकरांशी बातचित केलीय. या वेळी मुंबईकरांनी भाजपा आणि शिवसेनेची युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केलीय. तर काहिंनी युती झाल्यास भाजपा वरचढ होईल असे मतही व्यक्त केले.

Loading Comments