Advertisement

बेकायदा धार्मिक स्थळांवर होणार कारवाई ?


बेकायदा धार्मिक स्थळांवर होणार कारवाई ?
SHARES

मुंबई - राज्य सरकारनं बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार महापालिका आयुक्त आणि जिल्हा पातळीवरील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. यासंदर्भात राज्य सरकारनं परिपत्रकही काढलंय. तसंच अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात दोन महिन्यांत कारवाई करावी, असा आदेश दिलाय. बेकायदा धार्मिक स्थळांविरोधात कारवाईचा बडगा न उचलल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं कारवाईसाठी पावलं उचलली आहेत.

राज्यात 29 सप्टेंबर 2009नंतर सार्वजनिक जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली सर्व बेकायदा धार्मिक स्थळं डिंसेबरपर्यंत पाडा, असे आदेश राज्य सरकारला देण्यात आले होते. सोसायटी ऑफ फास्ट जस्टिस या सामाजिक संस्थेच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते भगवान रैयानी यांनी बेकायदा धार्मिक स्थळांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा