Advertisement

वाडिया रुग्णालयातील कामगारांचं धरणं


वाडिया रुग्णालयातील कामगारांचं धरणं
SHARES

परळ - येथील नौरोसजी वाडिया मॅटर्निटी रुग्णालयातील कामगारांची सहाव्या वेतन आयोगाची मागणी 10 वर्षांपासून थकली आहे. सहावा वेतन आयोग लागू व्हावा आणि थकबाकी मिळावी यासाठी कामगारांनी रुग्णालयातील एकमेव कामगार संघटना असलेल्या लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात धरणं आंदोलन करत निदर्शनं केली.
1958 मध्ये मुंबई महापालिका आणि राज्य शासनात झालेल्या करारात वाडिया रुग्णालयातील कामगारांना महापालिका कामगारांना लागू असलेलं वेतन आणि सेवाशर्ती लागू होत असल्याचं करारात नमूद आहे. त्या करारानुसार मुंबई महानगरपालिका कामगारांना 6 व्या वेतन आयोगानुसार देय असेलेलं वेतन वाडिया रुग्णालयातील कामगारांनाही लागू झालंय. मात्र राज्य शासनाचं अनुदान प्राप्त न झाल्यामुळे वाडियातील कामगारांना 2005 ते 2015 पर्यंतची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, आधीच्या सरकारच्या काळात उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कामगारांवर अन्याय होत असल्याचं कामगारांचं कामगारांचं म्हणणं आहे. याबाबत 4 जुलै 2016 रोजी युनियनने मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलंय. मात्र अद्याप त्यावर अमंलबजावणी झालेली नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा